TOTAL ASSOCIATED MEMBER : 104

संस्थेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सुविधा

सेवा करणाऱ्या सी ए पी एफ जवानांना केंद्र सरकारकडून दिले जाणारे आर्थिक लाभांबद्दल जागरूकता तसेच एलटीसी (अवकाश प्रवास सवलत), मुलांचा शिक्षण भत्ता/वसतिगृह अनुदान, ट्रान्सफर TA, TA/DA इत्यादींबाबत विशिष्ट फॉर्म प्रदान केले जातील आवश्यक वाटल्यास मार्गदर्शन केले जाईल.
आयुष्मान CAPFs- मार्गदर्शन आणि वैद्यकीय उपचारांचे पुनर्वितरण.
केंद्र सरकार तसेच संबंधित फोर्स मुख्यालयाकडून CAPF जवानांच्या पाल्यांना विविध शिष्यवृत्तींबद्दल जागरूकता.
कल्याण आणि पुनर्वसन, गृहमंत्रालय , पत्र क्रमांक WARB 157/ABM/2021/42 दिनांक 12 जानेवारी 2022 या पत्रांकानुसार माजी CAPF कर्मचाऱ्यांच्या आश्रितांना आणि मृतक कर्मचाऱ्यांचे नातेवाईक/विधवा यांना डिपेंडंट कार्ड /अश्रित कार्ड उपलब्ध करून देणे.
NPS विषयी जागरूकता (मोबाइल नंबर/ई-मेल अपडेट करणे, घराचा पत्ता, नावात सुधारणा, आंशिक पैसे काढणे, अंतिम पैसे काढणे, योजनेत बदल, एनपीएस पेन्शन खरेदी इ.)
सेवेत असताना किंवा सेवानिवृत्तीनंतर CAPF कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास NOK ला उपलब्ध आर्थिक लाभांबद्दल जागरूकता.
SBI सेंट्रल आर्म्ड पोलिस सॅलरी पॅकेज (CAPSP) मधून आर्थिक लाभा विषयी जानकारी.
E- grievances पोर्टल द्वारे, सेवार्थ जवान किंवा सेवानिवृत्त जवान यांच्या समस्येचे तात्काळ निवारण
पुनर्रोजगार / अनुकंपा नियुक्ती.
आयकर रिटर्न भरणे.

About Us

महाराष्ट्राचा गौरव आणि कर्तव्यनिष्ठेचा जागर

महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचा, स्वाभिमानाचा आणि त्यागाचा इतिहास कोरला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजच्या सीमेवरील प्रत्येक सैनिकापर्यंत, मराठी माणसाने देशप्रेम, निष्ठा आणि बलिदानाची परंपरा अखंड जपली आहे. ही परंपरा केवळ इतिहासाच्या पानांवर नाही, तर आजही देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तैनात असलेल्या महाराष्ट्र सुपुत्रांच्या शौर्यातून जग अनुभवत आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान – हिमालयाच्या बर्फाळ शिखरांपासून ते वाळवंटातील तप्त सीमेपर्यंत, दहशतवादग्रस्त खोऱ्यांपासून ते नक्षलग्रस्त जंगलांपर्यंत – प्राणांची बाजी लावून उभे आहेत. भारतमातेची अखंडता अबाधित राहावी, देशांतर्गत शांतता नांदावी आणि बाह्य आक्रमणाचा प्रत्येक वार परतवून लावावा, या एकाच ध्येयाने ते अहोरात्र कर्तव्यावर तटस्थ आहेत. त्यांचा हा त्याग केवळ वर्दीपुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्राच्या संस्कारांचा, आई-वडिलांच्या शिकवणीचा आणि मातीशी असलेल्या नाळेचा हुंकार आहे. प्रत्येक जवानाच्या हृदयात ‘राष्ट्र प्रथम’ हा मंत्र कोरलेला आहे आणि त्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची तयारी त्यांनी जन्मापासूनच केली आहे. *महाराष्ट्रातील जनतेला आमचे आवाहन आहे* – आपल्या या वीर सुपुत्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे, त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे आणि त्यांना सन्मानाची वागणूक देणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. कारण सीमेवर लढणारा जवान निर्धास्त राहिला, तरच देश सुरक्षित राहील.
जय हिंद! जय महाराष्ट्र!

Events

अर्धसैनिक परिवार कल्याण असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप रामचंद्र कडूसकर, सेवानिवृत्त उपनिरीक्षक (अनुसूचिविय), सीमा सुरक्षा बल यांनी सीआयएसएफ हेडकॉटर उरण ओएनजीसी मुंबई

Social activities